राजकिय
खा. सुजयदादा विखे व आ. राम शिंदे यांच्या हस्ते सोमवारी कर्जत तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ

कर्जत / सुभाष माळवे :
खासदार सुजयदादा विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांचे उपस्थितीत कर्जत तालुक्यातील ६ कोटी ५४ लाख रुपये किमतीच्या विकास कामांचे पाया भरणी समारंभ सोमवार दि.१३/२/२०१३ होणार आहे. सकाळी ९.३० वा. अळसुंदे येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा (रक्कम रु.१ कोटी ९७ लक्ष) भूमीपुजन समारंभ तसेच अर्थ संकल्पातून मंजुर असलेल्या राशीन अळसुंदे अंबीजळगाव-चापडगाव प्रजिमा १०१ (रक्कम रु. २ कोटी) चा भूमीपुजन समारंभ तसेच जिल्हा नियोजन अंतर्गत जनसुविधा योजनेतुन पेव्हर ब्लॉक, त्याच प्रमाणे दलित वस्ती सुधार अंतर्गत २२ लक्ष रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभी यावेळी करण्यात येणार आहे.
तर सकाळी ११ वा. राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या कॅम्पच्या लाभार्थीना साहित्यांची वाटप मातोश्री मंगल कार्यालय, कुळधरण रोड, कर्जत येथे करण्यात येणार आहे.
तर दुपारी २ वा. देशमुखवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचा (रक्कम रु. १ कोटी ९१ लक्ष) भूमीपुजन समारंभ तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ३५ लक्ष रुपयांच्या २ रस्त्यांचे भूमीपुजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, तालुका अध्यक्ष डॉ. सुनिल गावडे, अशोकराव खेडकर यांनी दिली
तरी या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.