करमणवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ..
कर्जत / प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील करमणवाडी या गावात मागील चार दिवसापूर्वी चोरट्यांनी मध्यरात्री गावाच्या वेगवेगळ्या भागात चोऱ्या केल्या.यामध्ये सायकर वस्तीवरील बाळू पुणेकर यांच्या घरी त्यांच्या मुलाची लग्नाची खरेदी केलेली होती त्यामधील पाच ग्राम दागिने,रोख पंचवीस हजार तसेच त्याच वस्तीवरील अतुल सायकर यांच्या घरून रोख पस्तीस हजार रुपये लांबवले तर पावणे वस्तीवर प्रदीप महानवर यांचे सुद्धा रोख चाळीस हजार रुपये त्याच दिवशी नेहले तसेच लांबोर वस्तीवरील राम महादेव लांबोर यांची विहीरीमधील पाईप कट करून नवीन साडे सातची मोटार चोरून नेहली.तर रासप नेते भरत शहाजी लांबोर यांच्या मोटारीचा पाईप कट करण्याचा प्रयत्न केला पण त्यात चोरट्यांना यश आले नाही.तसेच दिनांक 23 जानेवारीच्या रात्री रामदास भुजबळ यांच्या गोट्यातील एक बोकड चोरट्यांनी चोरून नेहले तर भुजबळ यांच्या घराजवळच एक मोटारसायकल आढळून आली आहे.या आठवड्यातील सततच्या चोरीच्या सत्रामुळे गावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तरी या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी असे नागरिकांमधून मत व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा