एस एम रोखठोक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

कर्जत लाईव्ह’ प्रसारमाध्यम बंदची धमकी

पत्रकारांचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत लाईव्ह हे प्रसारमाध्यम बंद करण्याची धमकी सोशल मीडियातून दिल्याचा कर्जत तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध करण्यात आला आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन देऊन व्हाट्सॲप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या प्रसादकुमार खेडकर याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार गणेश जेवरे, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, सुभाष माळवे, निलेश दिवटे, अफरोज पठाण, महादेव सायकर, भाऊसाहेब तोरडमल, योगेश गांगर्डे, किशोर कांबळे, सोमनाथ गोडसे, संतोष रणदिवे, किरण जगताप, अस्लम पठाण, विनायक ढवळे यांनी हे निवेदन दिले.

शनिवारी रात्री प्रसादकुमार खेडकर याने ‘नितीनभाऊ धांडे मित्र मंडळ’ या व्हाट्सॲप ग्रुपवर ‘कर्जत लाईव्ह’ हे प्रसारमाध्यम बंद करण्याची धमकी दिली. त्याचे तीव्र पडसाद पत्रकारांमध्ये उमटले. ही धमकी म्हणजे प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये कोणत्या विषयावर बातम्या प्रसिद्ध करायच्या हा पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. या धमकीचा निषेध करत खेडकर याच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे