राजकिय
कर्जत ला घुले च्या रूपाने भाजपला मिळणार बळ भाजप पक्ष प्रवेशाने कार्यकत्यांमध्ये संचरला उत्साह

कर्जत / प्रतिनिधी :
माजी जिल्हा परिषद सदस्य, मा. उपसभापती पं. स. कर्जत ग्रामपंचायत चे मा. सरपंच व विद्यमान अहमदनगर जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले पाटील यांचा भारतीय जनता पक्षप्रवेश निश्चित झाल्याने तालुक्यातील भारतीय जनता पक्षासह घुले समर्थक कार्यकत्यांना उत्साह संचारला आहे.
प्रविण घुले यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे कर्जत तालुक्यात भाजपाची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या तालुक्यात प्रविण घुले यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार तयारी सरू आहे. आता काही दिवसांतच घुले यांचा मोठ्या थाटात पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच मा. मंत्री व भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राम शिंदे यांची चोंडी येथे भेट घेतली होती. यावेळी कर्जत तालुक्याच्या आगामी राजकारणावर सविस्तर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.याच भेटीदरम्यान प्रविण घुले यांनी तालुक्यातील विकासकामांसंदर्भात राम शिंदे यांना एक निवेदनही सादर केले होते. यावेळी राम शिंदे यांनी प्रविण घुले यांना कामाला लागण्याची सूचना केली होती. घुले घराणे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहे.
राजकीय वार्तापत्र
सुभाष माळवे
घुले यांना तालुक्यात वाढतोय पाठिंबा
घुले यांच्या रुपाने भाजप पक्षाला एक नवा चेहरा समोर येत आहे. तालुक्यात सामान्य नागरिक, शेतकरी युवकांचा त्यांना भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र तालुक्यात दिसते आहे घुले यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करून तालुक्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम करून तळागाळातील सर्वसामान्य माणसाला आपल्या परीने साथ दिली आहे. पंरतु घुले यांना काँग्रेस पक्षातील जिल्हा व राज्य पातळीवरील नेतृत्वाने पाहिजे तेवढे पाठबळ दिले नाही. तरीही घुले यांनी एकाकी काँग्रेस पक्षाची व स्वता:च्या अस्तित्वाची लढाई लढून आपली ताकद दाखवून दिली आहे.
प्रविण घुले मित्र मंडळ
कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक गावात प्रविण घुले मित्र मंडळ असून अनेक गावात महत्वाच्या पदावरही हे कार्यकर्ते काम करतात. गावात हे कार्यकर्ते प्रमुख राजकीय भूमिकेत दिसून येतात त्या मुळे घुले यांची ताकद कायमस्वरूपी टिकून राहिली आहे. यापैकी काही निवडक कार्यकर्ते महेश तनपुरे, विलास निकत, दादासाहेब रोकडे, रणजित अडसूळ, विजय मोरे, ओकांर तोटे, श्रीराम गायकवाड, राजू बागवान , अमित नलगे, सुनील नलगे.