कर्जत / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसेवक पतसंस्था निवडणूकीसाठी ग्रामसेवक सचिन काळदाते यांनी अहमदनगर जिल्हा मतदारसंघातून ओबीसी या जागेवर उमेदवारी अर्ज भरला आहे.
सचिन काळदाते हे चिंचोली काळदात येथील मूळ रहिवासी असून त्याचे वास्तव्य हे कर्जत येथेच कायम राहिले आहे.
सचिन काळदाते यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
सचिन काळदाते यांनी ज्या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून काम केले त्या त्या ठिकाणी त्यांनी सर्व सामान्य जनतेला न्याय देवून व जनतेत मिसळून काम केल्याने सर्व सामान्य जनतेला आपलाच माणूस वाटतो आहे. काळदाते यांनी ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून अनेक ग्रामसेवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
काळदाते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांना जिल्हातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा