ब्रेकिंग
कर्जत मध्ये राहुल गांधी यांच्या फोटो ला जोडे मारो आंदोलन

कर्जत / प्रतिनिधी :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करीत, भाजप कर्जत शहर व भाजप युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला.
यावेळी राहुल यांच्या फोटो ला लाथाबुक्यांचा प्रसाद देण्यात आला. राहुल गांधी हे कायमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भाषणांमधून अपमान करतात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष गणेश क्षिरसागर, भाजपचे मा. तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, जेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, उपाध्यक्ष पप्पूशेठ धोदाड, राजेंद्र येवले, प्रशांत शिंदे, उमेश जपे, डॉ संदीप बरबडे ,सुनील काळे, बबन लाढाणे,रोहित ढेरे, निलेश यादव, विनोद दळवी, काका ढेरे आदी उपस्थित होते.
भाजपाच्या वतीने मंडल अधिकारी परमेश्वर सुद्रीक व अव्वल कारकून परसु होगले यांनी तहसीलदार याच्या वतीने निवेदन स्विकारले
घोषणाबाजी
या आंदोलनावेळी राहुल गांधी यांच्या बाबतीत प्रचंड घोषणाबाजी भाजपाच्या वतीने करण्यात आली. या घोषणाबाजी ने काही काळ वातावरण तंग बनले होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोलमडली होती.