ब्रेकिंग
राष्ट्रवादी ला धक्का राष्ट्रवादी चा नेता शिंदे गटात

कर्जत / प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. उपासभाती व नगरपंचायत चे मा. उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके यांनी शिंदे गटात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस व आ. रोहित पवार यांना धक्का दिला आहे.
नेटके यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे अनेक नेतेही लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
बापूसाहेब नेटके मेजर यांचे राजकीय वलय चांगले असून नेटके मेजर हे मितभाषी संयमी स्वभावाचे असल्याने कार्यकर्ते कायम नेटके मेजर यांच्या बरोबर असतात.
नगरपंचायतींच्या माध्यमातून बर्गेवाडीचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून बर्गेवाडी सह परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
नेटके मेजर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच तालुक्यातील अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. असे समजते.