ब्रेकिंग
कर्जत च्या बसस्थानकावर येताय, मग सावधानी बाळगा

कर्जत / प्रतिनिधी :
अनेक गावे दुर्गम भागात वसलेली आहेत. त्या गावांत जाण्याकरिता एसटीची सेवा उपलब्ध आहेत. त्याकरिता आगारातून विविध मार्गांवरून धावणाऱ्या बसेस सोडण्यात येत आहेत. परिणामी नागरिक आजही सुरक्षित प्रवास म्हणून एसटीकडे आकर्षित होतात. गर्दीचा लाभ घेण्याची शक्कल गेल्या काही दिवसांपासून पॉकीटमारांनी लढविली. येथे एसटी आली की प्रवासी बसमध्ये जागा पकडण्याकरिता बसच्या दारावर एकच झुंबड उडते.प्रत्येकजण आधी बसमध्ये शिरण्याकरिता प्रयत्न करत असतात. नेमका याच संधीचा लाभ घेत त्या गर्दीत घुसून चोरटे महिला,मुली यांच्या अंगावरील सोन्याच्या वस्तू व हातातील मोबाईल व रोख रक्कम लंपास करतात. हे चोरटे पुरूषांचे बॅग व खिसे चाचपतात. सावज सापडला की पंकिट दागिने व रोकड काढून बाजूला असलेल्या आपल्या साथिदारांकडे तो ऐवज देतात. त्यानंतर पुन्हा सावज शोधतात. आशा घटना सारख्या सारख्या घडत आहेत.
पॅकिट, रोकड, मोबाईल किंवा दागिने चोरीला जात आहेत. जोपर्यंत ज्यांचे पॅकिट चोरीला गेले हे माहित होते, तोपर्यंत पॉकीटचोर आणि प्रवासी देखील दूर निघून गेलेले असतात. हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे.
एसपी साहेब इकडेही लक्ष द्या
जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर एस. पी. राकेश ओला
यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सूचना करत अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यात अवैध दारूविक्री, मटका, जनावरांची वाहतूक आदींवर कारवाईचा सपाटा सुरू झाला. मात्र कर्जत उपविभाात सुरू असलेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता खुद्द पोलिस अधीक्षकांनीच याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.