
कर्जत / सुभाष माळवे
कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन च्या निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी आरपीआयच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
संजय भैलुमे,दादा उकिरडे, अन्सार शेख,लखन भैलुमे,सागर कांबळे,पनाजी कदम, संजय उकिरडे,बी.जी.भैलुमे, गणेश दिवटे, दिपक उकिरडे,सुदाम उकिरडे आदी उपोषणास बसले आहेत.
आरपीआय च्या निवेदनात म्हटले आहे की,कर्जत तालुक्यात 98 गावात केंद्र सरकार मार्फत हर घर जल हा महत्वाकांक्षी योजनेतून प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे.त्यानुसार कर्जत तालुक्यातील अनेक गावात पाईप निकृष्ट दर्जाचे वापरले तर काही ठिकाणी रस्ता खोदून कामे केली आहेत.अनेक गावात सहा इंचावर पाईप लाईन गाडली गेली आहे.त्यामुळे अनेक गावांतील कुटुंबाला नळाद्वारे पाणी मिळणार नाही त्यामुळे जलजीवन मिशन च्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी साठी हे उपोषण करण्यात आले आहे.
जुनेच पाइपलाइन ला नवीन पाईप
कोळवडी येथे पाईप खोदकाम करताना खोली अतिशय कमी, पाईप चांगल्या दर्जाचे वापरले नाहीत, पाण्याची टाकी बांधली नाही, मुख्य रस्त्यापासून अंतर सोडले नाही, ग्रामपंचायतीच्या जुन्या पाईपलाईनचा नवीन पाईप जोडले आहेत.तर विहीरीचे काम अतिशय खराब करण्यात आले आहे याची चौकशी करण्यात माली
दादा आबा उकिरडे
कर्जत तालुक्यातील जलजिवन चे कामे वा शासनाच्या नियमाप्रमाणे व इस्टीमेट प्रमाणे कामे होत नाहीत या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी चौकशी पूर्ण होईपर्यंत कामे बंद ठेवण्यात यावीत व संबंधित कामाचे बिले अदा करू नयेत अन्यथा फार मोठे आंदोलन करू
आरपीआय तालुका अध्यक्ष
संजय भैलुमे