ब्रेकिंग
कर्जत म.प. विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेच्या चेअरमन पदी शांतीलाल धोदाड यांची तर व्हा. चेअरमन पदी सौ. शोभा धांडे यांची बिनविरोध निवड

कर्जत / सुभाष माळवे
कर्जत परिसरातील महत्वाची शेतकऱ्यांची कामधेनू समजली जाणारी कर्जत म. प. विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी शांतीलाल सर्जेराव धोदाड यांची तर व्हाईस चेअरमन पदी सौ शोभा बप्पासाहेब धांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कर्जत म. प. विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक ही नगर जिल्ह्यात गाजली होती.या निवडीत जिल्हा बँकेचे संचालक व कर्जत तालुक्याचे सहकार महर्षी अंबादास पिसाळ यांच्या नेतृत्वाखालील श्रीसंत सदगुरु गोदड महाराज सहकार पॅनेल ने सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते.
या निवडणुकीकडे नगरजिल्हाचे लक्ष लागले होते पण तालुक्याचे सहकार महर्षी अंबादास पिसाळ यांनी विरोधांकाना दाखवून दिले सहकारात फक्त पिसाळ करिश्मा चालतो.
निवडीचे सर्वाधिकार अंबादास पिसाळ यांना
कर्जत म. प. विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदा बाबत सहकार सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी कुणाला निवडायचे यांचे सर्वाधिकार अंबादास पिसाळ यांना देण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते अंकुश यादव, बँक संचालक काकासाहेब तापकीर, सुनील शेलार, नितीन धांडे.नारायण नेटके, सुरेश खिस्ती.काकासाहेब ढेरे, एकनाथ शिंदे, बप्पासाहेब धांडे यांच्या सह परिसरातील नेतेमंडळी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी चेअरमन पदासाठी शांतीलाल धोदाड तर व्हाईस चेअरमन पदासाठी शोभाताई धांडे यांची नावे जाहीर केल्याने धोदाड व धांडे यांचेच निवडणूक अधिकारी यांच्या कडे अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवड बिनविरोध झाली.
या निवडीनंतर चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या सह सर्व संचालक मंडळ मिरवणूकीने जाऊन श्रीसंत गोदड महाराज यांचे दर्शन घेतले यावेळी जेष्ठ संचालक दत्तात्रय एकनाथ शिंदे म्हणाले की, गेली पंधरा वर्षांपासून तालुक्याचे नेते अंबादास पिसाळ यांच्या सारखा सहकार तज्ञ व संस्था हित जोपासणारा नेता असल्याने आपण सर्वच्या सर्व जागा जिंकून आलो.
विरोधांकांना सोसायटीच्या कामकाज ची माहिती नाही विरोधांकांनच्या पातळी सोडून प्रचाराला व खोट्या अमिषाला आणि मोठ मोठ्या स्वप्न दाखवून खोटे नाटये आरोप करणाऱ्या लोकांना सभासदांनी बाजूला सारून संस्था हित लक्षात घेऊन संस्था हित पाहणारे लोक निवडून दिले.
मतदारांनी संस्था हित पाहून निर्णय घेतला दहा वर्षे संचालक राहिले असे संचालक चेअरमन व व्हाईस चेअरमन झाले ही आनंदाची गोष्ट आहे. . असेही जेष्ठ संचालक शिंदे यांनी सांगितले.
बाळासाहेब ढेरे.म्हणाले की, मत विचारात घेऊन निवड केली आहे. संस्था चांगली आहे.सहकार व संस्था हित लक्षात घेऊन काम करावे लागते.असे मनोगत व्यक्त केले.
चेअरमन शांतीलाल धोदाड, व्हाईस चेअरमन शोभाताई धांडे या नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार जेष्ठ नेते अंबादास पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संचालक बाळासाहेब ढेरे, दत्तात्रय शिंदे, विक्रम धांडे, मारुती कवडे, भाऊसाहेब लाळगे, शांतीलाल धांडे, शिवाजी बरबडे, रमेश धांडे, दादा कांबळे, अदिका पांडुरंग दवणे, मधुकर खरात हे सर्व सदस्य उपस्थित होते.