आरोग्य व शिक्षण
मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधी कक्षाच्या कर्जत तालुका सह. कक्षप्रमुख पदी अँड. अविनाश मते यांची नियुक्ती

कर्जत/सुभाष माळवे ःः
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातुन गोर – गरिब , गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील गंभीर – महागड्या शस्त्रक्रिया / आजाराच्या रुग्णांना अर्थ सहाय्य करण्यात येते. सदर कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे अतिशय उत्तम कार्य राज्यभर करित आहेत. या कामाला गती देण्यासाठी व तळागाळातील, दुर्गम भागातील रुग्णांना या योजनेचा लाभ पोहचवण्यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात भरिव कार्य करित असणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली.
विभागीय कक्ष प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते राहुल ढवाण यांचे शिफारशीने (कर्जत अहमदनगर ) च्या सह. कक्ष प्रमुख पदी अँड . अविनाश मते यांची नियुक्ती आज मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केली.
कर्जत तालुकयातील रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षा कडून आर्थिक मिळवून देण्यासाठी मुंबईला फेर्या मारण्याची गरज नसून राहुल ढवाण व ॲड. अविनाश मते यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तालुक्यात कार्य करित आहेत. अँड. अविनाश मते यांचे तालुक्यातुन निवड करण्यात आल्याने अभिनंदन होत आहे.