कर्जत/ प्रतिनिधी ः
महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये ही कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या लोकांशी संबधित आहेत. आपल्याशी संबधित संस्थेत वेगवेगळे शैक्षणिक, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे, त्यांच्या करिअर सबंधित वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम, व्याख्याने घेतली जातात. उदा. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेचे मॉडर्न हायस्कूल, कॉलेज, अहमदनगरचे सारडा हायस्कूल, कॉलेज अशा काही संस्था या भाजप प्रणित लोकांच्या आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रम प्रसंगी त्यांचे सर्वच वरिष्ठ नेते तिथे येतात. मग तो काय राजकारणाचा अड्डा होतो का?
मग कर्जत जामखेड तालुक्यातील शाळा – विद्यालय, महाविद्यालय या बाबतीत पोटशूळ का? कावीळ झालेल्या माणसाला जसे सारे जग पिवळे दिसते, तसे रोहित दादांचा संबंध ज्या ज्या क्षेत्राशी येतो, त्या त्या क्षेत्रावर टीका करणे, अडचणीत आणणे, त्यांच्या कामात अडथळे आणणे असा एककलमी कार्यक्रम पाया खालील वाळू सरकलेल्या नेत्यांचा चालू आहे.
दादा हे रयत शिक्षण संस्थेचे पदसिध्द सदस्य आहेत त्यांच्याकडे या दोन्हीं तालुक्यातील रयतच्या शाळा- विद्यालयाचे पालकत्व आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून केवळ रयतच्याच नव्हे तर सर्वच शाळामधील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची धडपड असते. जगातील वेगवेगळ्या कंपन्या, संस्था यांच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत, प्रशिक्षण देण्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करतात. तिथे कोणतेही राजकारण नसते. मग आमच्या लोकप्रिय नेत्यांना रोहित दादांकडे पालकत्व आसलेल्या शाळा – विद्यालयात राजकीय वास येतो, याचे आश्चर्य वाटते . आणि विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून त्यांनी आपली बौध्दिक दिवाळखोरीच सिध्द केली आहे.त्यांनी
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा