कर्जत / सुभाष माळवे :
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे पोलिसांना धक्का बुक्की करून पोलीस गाडीचे नुकसानही करण्यात आले
याबाबत अधिक माहिती अशी की, तपासी अंमलदार पो.हे.कॉन्स्ट्रेबल उध्दव अर्जुन दिंडे व इतर ६ पोलीस हे कोरेगाव येथे रात्री ९.२५ वाजता पोलीस चार चाकी गाडी घेऊन गुन्हयातील आरोपींना पकडून घेऊन जाण्यासाठी आरोपीच्या घरी कोरेगाव, ता. कर्जत, जि.अहमदनगर येथे गेले होते. आरोपी व आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी पोलीसांच्या चार चाकी गाडीवर तुफान दगडफेक केली त्यामध्ये चारचाकी गाडीचा आरसा व काचाफोडून त्यांनी पोलीसांना धरून लाथाबुक्याने मारहाण सुध्दा करण्यात आली होती परंतु त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपींनी पोलीसांना लाथा बुक्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर आरोपी व पोलिसांनी संगनमत करून हे प्रकरण मिटावले आहे आसा आरोप राजेश मेंगडे यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात
केला आहे. मेंगडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत निवेदने पाठविली आहेत.
गुन्हा दाखल पोलिस निरीक्षक गावित
कर्जत पोलिस कोरेगाव येथे आरोपी यांना ताब्यात घेण्यास गेले असता आरोपीला ताब्यात घेवून पोलिस गाडीतून घेवून येत असताना तपास कामात अडथळा आणून सरकारी गाडीचे नुकसान केले आहे. त्यामुळे प्रतिक श्रीकांत वाघ, प्रदिप श्रीकांत वाघ व सारिका श्रीकांत वाघ याच्या वर पोलिस कामात अडथळा निर्माण केला म्हणून १८६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक कैलास गावित यांनी दिली.